breaking-newsक्रिडा

ISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय

  • इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा

बंगळुरू – गतउपविजेत्या बंगळुरू एफसीने माजी विजेत्या एटीकेचा 1-0 असा पराभव करताना हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील आपली अपराजित राहाण्याची मालिका कायम राखली. यावेळी बंगळुरूच्याएरीक पार्टालू याने पुर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला.

सामन्याच्या सुरूवाती पासूनच बंगळुरूने आक्रमक धोरण स्विकारले होते. बंगळुरूने तिसऱ्याच मिनिटाला गोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. किन लुईस याने डावीकडून आगेकूच करीत छेत्रीला पास दिला. छेत्रीने डाव्या पायाने फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती. दोन्ही संघांनी सुरवात सकारात्मक केली. यावेळी सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल बंगळुरूने केला.

यानंतर दहाव्या मिनिटाला बंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याच्या ढिलाईमुळे एटीकेच्या बलवंत सिंगला संधी मिळाली. त्याने चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण त्याचवेळी बेंगळुरूच्या जुआनन याने मैदानावर घसरत बलवंतला रोखले. तर, 37व्या मिनिटाला राहुल भेकेने डावीकडून किन लुईसला पास दिला. लुईसने बॉक्‍सध्ये पार्टालू याच्याकडे चेंडू सोपविला. मग पार्टालूने हेडींगवर लक्ष्य साधले. हाच गोल निर्णायक ठरला.

सामन्यात एटीकेचा कर्णधार मॅन्युएल लॅंझरॉत याला 14व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. पंच तेजस नागवेकर यांनी बंगळुरूला एटीकेच्या बॉक्‍सलगत फ्री किक दिली. त्यावर लॅंझरॉतने हुज्जत घातली. त्यानंतर तीन मिनिटांनी सेरॅनने बेफिकीरपणे बलवंतला बंगळुरूच्या बॉक्‍सलगत पाडले. त्यामुळे सेरॅनला सुद्धा यलो कार्ड दाखविण्यात आले.

बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रितसिंग संधू याने 19व्या मिनिटाला चपळाई दाखविली. गेर्सन व्हिएराने मध्य क्षेत्रात एव्हर्टन सॅंटोसला पास दिला. त्यावर एव्हर्टन याने सफाईदार फटका मारला होता, पण तो संधूने अडविला. जयेश राणेने 31व्या मिनिटाला उजवीकडे अंकित मुखर्जीची घोडदौड हेरली आणि त्याला पास दिला. अंकित बॉक्‍समध्ये आपल्या सहकाऱ्याला पास देण्यासाठी प्रयत्नशील होता, पण पार्टालू याने बेंगळुरूसाठी बचाव केला.

उत्तरार्धात एटीकेचे काही प्रयत्न वाया गेले. 57व्या मिनिटाला फ्री किकवर मॅन्युएलने मारलेला चेंडू बलवंतच्या दिशेने गेला. त्यावेळी बलवंतने अकारण आकर्षक फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला. 63व्या मिनिटाला बंगळुरूच्या बचाव फळीने बलवंतला ऑफसाईडच्या सापळ्यात अडकविले.

बलवंतने 67व्या मिनिटाला घोडदौड केली होती. जॉन जॉन्सनने त्याला पास दिला होता. त्यानंतर बलवंत फटका मारण्याच्या प्रयत्नात असतानाच बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने पुढे सरसावत दडपण आणले. त्यामुळे बलवंतला सफाईने फटका मारता आला नाही आणि अखेरीस चेंडू बाहेर गेला.

बंगळुरूने 11 सामन्यांत आठवा विजय मिळविला असून तीन बरोबरी साधल्या आहेत. त्यांचे सर्वाधिक 27 गुण झाले. बंगळुरूचा गोलफरकही 10 (18-8) असा सर्वोत्तम आहे. मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 21 गुण) दुसऱ्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (11 सामन्यांतून 20) तिसऱ्या, तर जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) चौथ्या स्थानावर आहे. एटीकेला 12 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरींसह त्यांचे 16 गुण व सहावे स्थान कायम राहिले.

निकाल : बंगळुरू एफसी : 1 (एरीक पार्टालू 37) विजयी विरुद्ध एटीके ः 0.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button