Breaking-newsराष्ट्रिय

अयोध्या: तुम्हाला देशात शांतता नकोय का?-SC

Share On

नवी दिल्ली: तुम्हाला देशात शांतता नकोय का? अशा शब्दांत ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका आज फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यावर जोरदार ताशेरेही ओढले.
पंडित अमरनाथ मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर देशात शांतता रहावी आणि लोकांनीही शांततेत जीवन जगावं असं तुम्हाला वाटत नाही का?, असा सवाल कोर्टाने केला. यापूर्वी अलहाबाद कोर्टाने हीच याचिका फेटाळून लावत मिश्रा यांना पाच लाखांचा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करण्यास नकार देत मिश्रा यांना अलहाबाद हायकोर्टाने ठोठावलेला दंड कायम ठेवला आहे. अयोध्येचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. त्यानंतरही कोर्टात याचिका दाखल करण्यात येत असून कोर्ट अशा याचिका फेटाळून लावत आहे. अयोध्येतील जमिनीचा वादही कोर्टात प्रलंबित आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button