ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुंठेवारीसाठी अर्ज करण्यास २ महिन्यांची मुदतवाढ

पिंपरी |  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बांधकामे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार नियमितीकरणासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांची मुदत सोमवारी (दि. २१) संपली आहे. अर्ज स्वीकारण्यास २० एप्रिलपर्यंत अशी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी आज दिली.

शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने २० डिसेंबर २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अशी दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्या मुदतीमध्ये केवळ १५० अर्ज प्राप्त झाले आहेत.

शहरात दीड लाखांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे असताना अल्प संख्येत अर्ज आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे या योजनेला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत केवळ १५० अर्ज प्राप्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button