breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एक इंच जमीन कोणाला देणार नाही, घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले: संरक्षण मंत्री

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी बोलताना चीनला इशारा दिला. ‘एक इंच जमीन कोणाला घेऊ देणार नाही. दोघांनीही एलओसीचा आदर करावा. चीन सोबत चर्चा सुरु आहे. सीमेवर शांतता असणं गरजेचं आहे. घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.

१९६२ पासून सीमेवर अतिक्रमण सुरू आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षा प्रश्नी सर्व एकत्र आहोत. असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, चीनने एलएसीवर शस्त्रे आणि दारुगोळा आणि सैन्यांची संख्या वाढविली. चीनचा सामना करण्यासाठी आम्ही एक स्पष्ट पाऊल उचलले आहे. आमच्याकडे शूर सैनिक आहेत जे मोक्याच्या ठिकाणी तैनात असतात. सैनिकांनी हे सिद्ध केले आहे की राष्ट्राची अखंडता टिकवण्यासाठी ते काहीही करतील. दोन्ही बाजूंनी एलएसीचा सन्मान व्हावा अशी आमची इच्छा आहे. एकतर्फी एलएसीमध्ये कोणताही बदल करु नये.’ राजनाथ सिंह म्हणाले की, ‘लडाखमधील सीमेचे रक्षण करण्यात आमच्या सैनिकांनी मोठे पराक्रम दाखवले आहेत, म्हणूनच भारत चीनसमोर ठामपणे उभा आहे. आम्ही हे स्पष्ट केले आहे की या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने माघार घेणे आवश्यक आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button