पिंपरी / चिंचवड

बँक ऑफ इंडियामध्ये 18 बनवत चेक वटवले : 18 लाख 71 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

अज्ञात व्यक्तीने एका कंपनीच्या खात्यावर 18 बनवत चेक भरून ते खरे आहेत, असे भासवून ते वटवले. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी खातेधारकाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 20 डिसेंबर 2021 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बँक ऑफ इंडिया या बँकेच्या भोसरी शाखेत घडला.

राजेश लालसाहब सिंह (वय 44, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अन्सूल प्रोटेक्शन सर्विसेस प्रा ली या कंपनीच्या नावाचे बँक ऑफ इंडिया भोसरी शाखेत खाते आहे. त्यामधून यज्ञात व्यक्तीने 21 लाख 20 हजार 723 रुपये रकमेचे 20 चेक पास केले. आरोपीने चेकवर बनवत सही केली, सहीसह एकूण आठ चुका चेकवर केल्या. ही बाब निदर्शनास येताच बँकेने दोन लाख 49 हजार दोन रुपये फिर्यादी यांच्या खात्यात परत वळवले. अज्ञात व्यक्तीने 18 चेकद्वारे 18 लाख 71 हजार 7 21 रुपयांची फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button