breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना प्रतिबंधक लसीचे 16 हजार 62 डोस गेले ‘वेस्ट’

पिंपरी / महाईन्यूज

कोरोना विषाणुचा बिमोड करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड 19 लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये आजअखेर 3 लाख 43 हजार 191 लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर, 16 हजार 62 लसीचे डोस वाया गेले आहेत.

कोविड 19 लसीकरण मोहीम 16 जानेवारी पासून हाती घेतले. वय 45 च्या पुढील नोंदणीकृत आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेकडे 3 लाख 69 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध झाले. त्यापैकी आजअखेर एकूण 3 लाख 43 हजार 191 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 16 हजार 62 डोस वायफळ गेले आहेत. तर, 10 हजार 247 लसीचे डोस शिल्लक आहेत. गुरूवारी (दि. 22) दिवसभरात 9 हजार 256 लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button