breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

मुंबई – महाराष्ट्रासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच कोरोनावरील लसही अंतिम टप्प्यात असून लवकरच देशभरात लसीकरणही सुरू होणार आहे. मात्र असे असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या सहा जणांना या नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर असून देशभरात काळजी घेतली जातेय. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग मागील दहा महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा सुरू केल्या जाणार नाहीत असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. ३१ डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या किती याचा आढावा घेऊन मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या आढावादरम्यान अन्य राज्यातील कोरोना स्थितीही भयानक आहे. तर इतर देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांकरिता १५ जानेवारी २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button