breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

15 हजार कोटींची कामे मार्गी लगत आहेत- खासदार आढळराव पाटील

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गेल्या साडेपाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अनेक विकास कामे मंजूर करून आणली. त्यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत. प्रशासकीय त्रुटींमुळे काही कामांना विलंब होत आहे. काही कामांचा डीपीआर तयार होत आहे, अशी सुमारे 15 हजार कोटींची कामे मार्गी लागत आहेत, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी नियोजन केल्याप्रमाणे सर्व कामे मार्गी लागत आहेत. केवळ फ्लेक्सबाजी करून नागरिकांच्या प्रश्नांचा कळवळा आहे, असे दाखवून विरोधकांना त्याचा उपयोग होणार नाही. मी केलेल्या कामांवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मला त्यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करण्याची सुध्दा गरज नाही. विरोधकांना कुंबकरणासारखी दहा वर्षे झोप लागलेली होती. आता त्यांना जाग आली आहे. एवढे दिवस नागरिकांचे प्रश्न त्यांना दिसले नव्हते का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button