breaking-newsआंतरराष्टीय

पुलवामा हल्ला : दिल्लीतून आरोपीला अटक, कपडे विक्रेत्याचा केला होता बनाव

नवी दिल्ली – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. साजिद खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो दिल्लीत कपडे विकणारा असल्याचा बनाव करून राहत होता.

पुलवामा हल्ल्याचं दिल्ली कनेक्शन आता समोर आलं आहे. दिल्ली स्पेशल सेलने आरोपी साजिद खान याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खान हा नुकतंच मारला गेलेल्या ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा मुद्दसिर याचाच साथीदार आहे.

अटक करण्यात आलेला साजिद खान हा गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत कपडे विकणाऱ्याच्या वेशात वावरत होता. तसंच मुद्दसिर या जैशच्या दहशतवाद्यासोबतच तो दिल्ली आला होता. दिल्लीत जैशचे स्लीपर सेल तयार करण्याच्या उद्देशाने साजिद खान आणि मुद्दसिर हे दिल्लीत आल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच मुद्देसिर याला कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर आता साजिदला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, साजिद खानच्या भावालाही अझहर मसूदचा भाचा उस्मान हैदर याच्यासोबत ठार करण्यात आलं होतं.

पुलवामातील दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button