breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रशियाची कोरोना प्रतिबंधक लस पूर्ण सुरक्षित : ‘लॅन्सेट’चा दावा

कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात विकसित केलेली रशियाची ‘स्पुटनिक-व्ही’ ही लस उपयुक्त असल्याचे आढळले आहे. लॅन्सेट या नियतकालिकांत प्रकाशित संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

या वृत्तानुसार, ज्या रुग्णांवर या लसीची प्रारंभिक चाचणी करण्यात आली, त्यांच्यात कुठलाही साइड इफेक्ट न होता अँटिबॉडीज विकसित झाल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात ७६ लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर २१ दिवसांच्या आत सर्व रुग्णांत अँटिबॉडी प्रतिक्रिया म्हणजे टी-पेशी दिसल्या. ४२ दिवस दोन टप्प्यांत या चाचण्या चालल्या.

या लसीत ह्युमन अॅडेनो व्हायरस २६ व ह्युमन अॅडेनो व्हायरस टाइप ५ (आरएडी ५- एस) यांचा समावेश आहे. संशोधकांनुसार, अॅडेनोमुळे सामान्यत: सर्दी होते. विषाणूंना मानवी पेशींची प्रतिकृती तयार करता येऊ नये व रोग निर्माण करणे शक्य होऊ नये यासाठी या लसीत त्यावर मात करण्याचा उपाय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button