breaking-newsमुंबईराष्ट्रिय

८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया?

मुंबई | महाईन्यूज

ज्या एअरलाईन्सचा जेआरडी टाटांनी ८८ वर्षांपूर्वी पाया घातला होता, ती पुन्हा टाटा होणार असल्याचं दिसून येत आहे. अडचणीत आलेल्या एअर इंडियासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि टाटा समूह या नॅशनल कैरियरसाठी आपली दावेदारी अंतिम करण्याच्या स्थितीत आहे. टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ही बोली लावण्यासाठी काम सुरू केले आहे. १९३२ मध्ये जेआरडी टाटाने एअर इंडियाचा पाया रचला होता आणि १९४६ मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झाले. सुरुवातीला ते टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होते, राष्ट्रीयकरणानंतर १९४८ मध्ये त्याला एअर इंडिया असं नाव देण्यात आले. आता ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटाच्या समुहात परतू शकते. टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण (टाटाचे यात 51% भागभांडवल आहे) आणि एअर इंडियाची 100% उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचा समावेश आहे.

टाटा समूहाने एअर एशियामध्ये 49% भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नांडिस यांच्याकडेही संपर्क करुन एअर इंडिया एक्स्प्रेस खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भागधारक करारानुसार फर्नांडिस तयार नसल्यास टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नवीन करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात. टाटा समूहाने एअर एशिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे विलीनीकरण प्रस्ताव तयार केला आहे. या विलीनीकरणामुळे फर्नांडिसचा भारतीय विमानचालन क्षेत्रातील मोठा वाटा होईल, त्यामुळे दोन्ही पार्टनरचा विजय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. टाटा ग्रुप आणि फर्नांडिस यांच्या संयुक्त विद्यमाने २०१३ मध्ये एअर एशियाची सुरूवात झाली. टाटा आणखी एक पूर्ण-सेवा वाहक विस्तारा चालवते, जी सिंगापूर एअरलाइन्ससोबत संयुक्त भागीदारीमध्ये आहे. टाटा समूहाचा यामध्ये 51% हिस्सा आहे. नुकतेच टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, “विलीनीकरण केल्याशिवाय आम्ही तिसरे विमान चालवू शकत नाही”. एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यासमवेत टाटा समूहाला फुल सर्व्हिस स्पेसमध्ये मक्तेदारी मिळू शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button