breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

५४ पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं होणार सन्मान…

मुंबई | महाईन्यूज |

केंद्रीय गृह मंत्रालयानं या पोलिसांची यादी जाहीर केली आहे … या याृदीनुसार राज्यातल्या ५४ पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान करण्यात येणार आहे.. देशातल्या १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ५४ जणांचा समावेश आहे. यापैकी १० पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झालं आहे.

अर्चना त्यागी
संजय सक्सेना

अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा. पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक) या चार अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे या पोलिसांचा शौर्य पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातल्या ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदकानं गौरवण्यात येईल.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button