breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्विकृत सदस्य पदी डावलले, भाजप कार्यकर्ते मंगळवारी प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

पिंपरी : महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात स्विकृत सदस्य निवडीमध्ये भाजपच्या  निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.  त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते मंगळवारी (दि.8) प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयावर प्रत्येकी 3 असे एकूण 24 कार्यकर्त्यांना स्विकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली. यामध्ये सदस्य निवडीत शहरात भाजप जिवंत ठेवणा-या निष्ठावंत  कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आशा होती ; मात्र,  कारभारी नेत्यांनी त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी दिली. त्या विरोधात स्थानिक भाजप कारभार्‍यांच्या विरोधात पिंपरीच्या  डॉ.आंबेडकर चौकात एकदिवसीय आमरण उपोषण कार्यकर्त्यांनी केले. यावर प्रदेश भाजप नेत्यांची त्यांची दखल घेतली. त्यानंतर शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली.  त्यावेळी शहराध्यक्षांना उपोषणकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी उपोषण केलेल्या कार्यकर्त्यांशी  चर्चा केली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले.  उपोषण कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बैठकीसाठी बोलविल्याचे समजते आहे. या बैठकीमध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांकडे आपले गार्‍हाणे मांडणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button