breaking-newsपुणे

३० जूनला माऊलींच्या पादुका एसटीने पंढरपूरला जाणार !

पुणे:गेल्या सात शतकांपासून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा आषाढी पायी पालखी साेहळा यंदा अलीकडच्या इतिहासात प्रथमचकोरोनाच्या संसर्गामुळे सर्वसामान्य व वारकऱ्यांना अनुभवता येणार नाही.

आळंदी येथून तुकाेबा व माउलींच्या पादुका हेलिकाॅप्टर, विमान अथवा बसने थेट पंढरपूरलानेण्यात याव्यात, असा निर्णय झाला होता. अंतिम पर्याय त्या वेळची पावसाची स्थिती पाहून निवडला जाईल असे सांगण्यात आले होतेत्यानुसार 

आळंदीच्या पालखीसाेबत मानाच्या ६ पालख्याही पंढरपूरला जाणार असून त्याचे व्यवस्थापन शासनामार्फत करण्यातयेणार आहे.

देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या एसटी बसने ३० जूनला पंढरपूरला जाणारआहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीचा हा सोहळा दरवर्षी उत्साहातसाजरा होतो मात्र यंदा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व प्रथा परंपरांचे पालन करत हा सोहळा पार पडणार आहे

पंढरपुरमध्ये यंदा २ जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. कोरोनाकाळात लोकांनी सोहळ्यासाठी गर्दी करू नये म्हणून पंढरपुरमध्ये २९जूनपासून २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा या काळात सुरू असतील.खबरदरीचा उपायम्हणून पंढरपूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आह.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button