breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

२४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

महाईन्यूज |

अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्यात आलेली आहे. साधारणपणे अवघ्या २४ तासांत अफगाणिस्तानच्या सैनिकांनी १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे. जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विविध अभियानात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अन्य ४५ दहशतवादी जखमी झालेले आहेत. शिवाय, पाच दहशवतवाद्यांना अटक करण्यात देखील यश आलेले आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याद्वारे १५ प्रांतामध्ये दहशतवाद्यांविरोधात १८ अभियान राबवण्यात आले होते.

यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, मागील २४ तासांत अफगाणिस्तानमधील १५ प्रांतांमध्ये १८ अभियान राबवण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल १०९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर अन्य ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय, पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button