breaking-newsक्रिडा

२३ वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविंद्रला रौप्यपदकावर समाधान

२३ वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रविंद्रला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. ६१ किलो वजनी गटात रविंद्रला किर्गिस्तानच्या उल्कबेक झोल्डोश्बेकोव्हने ५-३ च्या फरकाने हरवलं. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात ही स्पर्धा पार पडली. याआधी २०१६ साली रविंद्रने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण तर २०१४ साली कॅडेट आशिया अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं.

अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदक पटकावण्याची रविंद्रकडे चांगली संधी होती. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूच्या भक्कम बचावापुढे रविंद्र अपयशी ठरला. मध्यंतरीच्या काळात रविंद्रने आपल्या ठेवणीतले काही खास डाव वापरत पुनरागमन केलं होतं. मात्र उल्कबेलने सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. २०१९ सालातील २३ वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button