breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

२००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं थांबवली!

नवी दिल्ली:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं ही माहिती दिली.

केंद्र सरकारनं २०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची नोट चलनात आणली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.

  • २००० रुपयांच्या नोटा झाल्या कमी….

गेल्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. २०१८-१९मध्ये चलनातील २०००च्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या.

  • बनावट नोटांचा बाजार तेजीत

रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार, बनावट नोटांची संख्या तेजीनं वाढत आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीनंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. तर २०१७मध्ये पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. आर्थिक वर्ष २०१७-१८च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांमध्ये १२१ टक्क्यांनी वाढ झाली. तर २००० रुपयांच्या बनावट नोटांची आकडेवारी २१.९ टक्के आहे. सरकारने २०० रुपयांची नोट २०१७मध्ये चलनात आणली. २०० रुपयांच्या १२, ७२८ बनावट नोटा सापडल्या. तर गेल्या वर्षी केवळ ७९ बनावट नोटा सापडल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button