breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभेसाठी एक अर्ज दाखल, 15 जणांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेले

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

205 चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आज (सोमवार) एक अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर 15 जणांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेेले आहेत. त्यामुळे 4 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने येत्या चार दिवसात इच्छुक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आज (सोमवार) धर्मपाल यशवंत तंतरपाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर महादू भोंडवे, नगरसेवक राहूल कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह शशिकांत निकाळजे, रविंद्र पारधे, एमआयएमकडून जावेद शेख, मिलिंद भोसले, अमोल देवकुले, एकनाथ जगताप, राजेंद्र काटे, महावीर संचेती, शिवाजी धोंडे, चिंतामणी सोंडकर यांनी नामनिर्देशनपत्र घेवून गेले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी 4 सप्टेंबर 2019 दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे अद्याप ब-याच राजकीय उलथापालथ होणार असल्याने प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button