breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगाराने गॅस एजन्सी मालकाला भर चौकात लुटले, चार आरोपींना हातकड्या

  • 12 तासात पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा
  • पावने तीन लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील आदिती भारत गॅस एजन्सीच्या मालकाला पैसे घेऊन जाताना पाळत ठेवून एजन्सीमधील कामगाराने कट रचून लुटले. डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल दोन लाख 56 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यावर पोलिसांनी शिताफीने लुटारूंचा माघ काढत एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धागोदोरे हाती लागताच त्याच्या तीन साथिदारांना पोलिसांनी हातकड्या घातल्या.

पिंपरी-चिंचवड मधील निगडी प्राधिकरणात अदिती भारत गॅस एजन्सी आहे. गुरूवारी (दि. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास मालक सुहास पांडुरंग मोहिते गल्ल्यातील दोन लाख 56 हजार 457 एवढी रक्कम बॅगेत घेऊन घरी निघाले होते. त्यांच्यावर पाळत ठेवून एजन्सीतील पूर्वीचा कामगार जावेद इद्रीस शेख (वय 19, रा. दिनेश अपार्टमेंट फ्लॅट नंबर 101, आनंद हॉस्पीटल, वनदेवनगर, थेरगाव) याने साथिदारांसह मालकाला लुटण्याचा कट रचला. आकुर्डीच्या दळवीनगर येथील पुलावर दोन दुचाकींवर येऊन मोहिते यांना रस्त्यात अडविले. कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्याजवळची रोकड घेऊन शेख आणि त्याचे साथिदार पसार झाले.

युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे शुक्रवारी (दि. 17) गस्तीवर असताना हा प्रकार त्यांच्या कानावर पडला. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. तपास यंत्रणा हलवून गॅस एजन्सीत पूर्वी काम करत असलेल्या जावेद शेखला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने अन्य साथिदारांची नावे सांगितली. त्यावर पोलिसांनी जावेदचे साथिदार मोहम्मद मुर्तुजा अकसापुरे (वय 22, रा. गुजरनगर, थेरगाव), दीपक कालीदास तेलंगे (वय 21, रा. वनदेवनगर, लेन नंबर 1, थेरगाव), विशाल लहु शिंदे (वय 19, वाकडकर वस्ती, वाकड) यांना पिंपरी गावातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. तपासात त्यांच्याकडे 2 लाख 41 हजार 340 रुपये रोकड पोलिसांना मिळाली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली व तीन मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 83 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरीष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सपोनि गणेश पाटील, पोउनि काळुराम लांडगे आदी कर्मचा-यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button