breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
होम क्वारंटाईनचा नियम तोडणाऱ्या तिघांवर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/375256-375053-374882-left-hand-stamp1.jpg)
मुंबई – कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार देशातील शहरांवर आज शुकशुकाट दिसतोय.
दरम्यान परदेशातून आलेल्यांना स्वत:हून क्वारंटाईन होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. श्रीवर्धनमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिघी सागरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिघेजण सौदी आणि दुबई येथून भारतात आले होते.