breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार

 

पुणे | प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन यंदा पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार आहे. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी राज ठाकरे यांच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान, राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी मनसे पदाधिकार्याच्या जनसंपर्क कार्यालायचे उद्घाटन करणार आहेत. तर, संध्याकाळी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

नाशिक महापालिकेत मनसेचे सत्ता मिळवली होती. त्यामुळे मनसेने आता राज्यातील सर्वच महापालिकेत आपलं नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. म्हणूनच मनसेचे या निवडणुकांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी महापालिकांसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button