breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्क अनिवार्य केलं आहे. केंद्र सरकार यासंबंधी आदेश जारी करणार आहे. यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आहे. यासोबत दंडाचीही तरतूद करण्यात आलेली आहे.

केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून हॉलमार्क शिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाहीये. सोने व्यापाऱ्यांना जुने दागिने विकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

  • हॉलमार्किंगमुळे फसवणूक होणार नाही
  • हॉलमार्क बंधनकारक केल्यानंतर फसवणुकीला आळा घालण्यात मदत होईल असं रामविलास पासवान यांनी म्हटलेलं आहे. अनेक सोने व्यापारी ९ कॅरेटचा दागिना विकून २२ कॅरेटचे पैसे वसूल करतात. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांची विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच जर कोणी सोने विक्रेता किंवा हॉलमार्क केंद्राने फसवणूक केली तर त्यांना एक लाख किंवा एकूण दागिन्यांच्या पाच पट दंड ठोठावला जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button