breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

‘हे’ स्मार्टफोन आधारित उपकरण वापरून घरबसल्या करा झिका व्हायरसची तपासणी

बोस्टन: जगभरामध्ये झिका व्हायरसमुळे नवजात शिशू शारीरिक व्यंधत्वाचे शिकार बनत आहेत. गर्भधारणा झालेल्या महिलांच्या तपासण्यांमध्ये झिका हा व्हायरस सहजासहजी सापडत नाही कारण त्याचे गुणधर्म इतर साथीच्या रोगांप्रमाणेच असतात. परिणामी नवजात शिशूंमध्ये मेंदूचा विकास न होणे, शरीराची वाढ खुंटणे इत्यादी शारीरिक समस्या जाणवतात.
मात्र शास्त्रज्ञांनी आता याच्यावर एक रामबाण उपाय शोधून काढला असून त्यांनी ‘स्मार्टफ़ोन’ आधारित ऑप्टिकल उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचे नामकरण युएसडी ५ असे करण्यात आले आहे. हे उपकरण स्मार्टफोनला जोडल्यानंतर ते शरीरातील झिका व्हायरसची हालचाल स्मार्टफोन मधील उच्च दर्जाच्या कॅमेऱ्या द्वारे टिपते व त्याच्या हालचालीच्या वेगावरून त्या व्यक्तीला झिका व्हायरसची बाधा झाली आहे अथवा नाही हे सांगू शकते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button