breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“पाणी अडवा अन् नगरसेवकांची जिरवा”, पाणी पुरवठा अधिका-यांचा उद्योग

  • नगरसेवक तुषार कामठे यांचा संताप
  • सर्वसाधारण सभेत प्रशासनावर साधला निशाना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन शहरात “पाणी अडवा अन् नगरसेवकांची जिरवा” हे धोरण राबवते आहे. पाण्याची बोंब असताना सहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पाणी धोरणाची अंमलबजावणी न केल्यावरून गुरूवारी (दि. 6) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. प्रभागातल्या या दैनिय अवस्थेवर संताप व्यक्त करत नगरसेवक तुषार कामठे यांनी पालिका प्रशासनाचे कान उपटले.

 

नागरिकांनी अनधिकृतपणे घेतलेले नळजोड थांबविण्यासाठी, तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दरवाढीबरोबर अनधिकृत नळजोडाबाबत धोरण तयार केले. मात्र, धोरणावर शिक्कामोर्तब होऊन सहा महिने उलटले, तरी ते महापालिका प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवले आहे. त्याबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी सभेत अनधिकृत टप-या व अतिक्रमणांवरून चर्चा करताना अनधिकृत नळजोड  व शहरातील पाणीपुरवठ्याचा विषय मांडला.

 

कामठे म्हणाले की, सध्या शहरात पाणीपुरवठा विस्कळीत असून नाकरिकांना त्रास होत आहे. दुषीत पाणीपुरवठा होत आहे. अशी परिस्थिती असताना अधिका-यांनी मात्र, पाणी अडवा आणि नगरसेवकांची जिरवा हे धोरण अवलंबले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाणीपट्टी दरवाढ आणि अनधिकृत नळजोड कायम करण्याच्या धोरणाला २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी पाणीपुरवठा विभाग व अधिका-यांनी सहा महिने उलटले, तरी केलेली नाही. प्रभागात कामे करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसून परस्पर काहीही केले जाते, असा आरोप कामठे यांनी केला आहे.

अष्टीकरांचा पदभार काढुन घ्या

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे अनेक विभागांचा कारभार आहे. त्यांचे लक्ष नाही. एका अधिका-याला एक आणि दुस-याकडे अनेक विभाग का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडील पदभार काढुन घेण्याची मागणी सभेत नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button