breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हॅरीस पुलालगतचा नवीन समांतर पूल वाहतुकीसाठी आजपासून खुला

पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बोपोडीत नदीवर बांधलेला हॅरिस पुलालगतचा नवीन पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले.

सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका आशा शेंडगे, स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, माऊली थोरात, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद ओंबासे, एकनाथ पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, आशा राऊत यावेळी उपस्थित होते.

पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताना नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. या कोंडीतून मुक्‍तता करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्‍तरित्या हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला होता. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे.

बोपोडीतील झोपडपट्टीच्या स्थलांतराला विलंब झाल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येण्याच्या पुलाच्या बांधकामाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुलाचे काम पूर्ण झाले असून आजपासून पूल वाहतुकीसाठी खूला केला आहे. त्यामुळे बोपोडीतील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button