breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

‘द रॉक’च्या वडिलांचं निधन, WWE ने व्यक्त केला शोक

नवी दिल्ली | WWE चे स्टार रॉकी जॉनसन यांचं निधन झालं. रॉकी जॉनसन हे हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉनसनचे वडील होते. रॉकी यांचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

रॉकी जॉनसन यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर १९८० च्या दशकात त्यांनी WWE मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. WWE मध्ये त्यांनी घवघवीत यश मिळावलं होतं. अगदी कमी वेळात त्यांची तुलना WWE मधील दिग्गजांशी केली जाऊ लागली. रॉकी जॉनसन यांचा जन्म २४ ऑगस्ट १९४४ मध्ये कॅनडा येथे झाला होता. लहान वयातच ते कुस्ती खेळू लागले होते. रॉकी यांना ड्वेन, कर्टिस आणि वंडा बाउल्स ही तीन मुलं आहेत. वडिलांप्रमाणे ड्वेनने आपल्या करिअरची सुरुवात WWE मधून केली. ड्वेनला WWE आणि WWF मध्ये ‘द रॉक’ या नावाने ओळखलं जात होतं. रॉकी यांनी टोनी एटलससोबत मिळून WWEसाठी द सोल पेट्रोल नावाची एक टीम तयार केली. विशेष म्हणजे WWE ची ती पहिली आफ्रिकी अमेरिकी टीम होती आणि या टीमने १९८३ मध्ये वाइल्ड सेमॉन्सला हरवलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button