breaking-newsराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशमध्ये डिसेंबर-जानेवारीत होणार पंचायत राज निवडणुका

शिमला- हिमाचल प्रदेशात पंचायत राज संस्थांच्या निवडणुका डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होतील, अशी माहिती ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर यांनी दिली.

कंवर म्हणाले की, हिमाचल प्रदेशात नवीन पंचायत स्थापनेची प्रक्रिया सुरु झाली असून हे काम वेळेत पूर्ण होईल. प्रदेशात मागील वेळी डिसेंबर आणि जानेवारीत पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि 22 जानेवारीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. 22 जानेवारी 2021 ला पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राज्य निवडणूक आयोगाला कायद्यानुसार 5 वर्षाच्या आत निवडणूक करणे बंधनकारक आहे. पंचायतीच्या स्थापनेसाठी कमीतकमी असा काही कालावधी निश्चित नसल्याने सरकार नवीन पंचायतीच्या स्थापनेसाठी अधिक वेळ घेऊ शकणार नाही. नवीन पंचायतीची 16 ऑगस्ट रोजी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी जवळपास 470 प्रस्ताव आले आहेत. राज्य सरकार नवीन पंचायतींसाठी लवकरच निकषही निश्चित करेल आणि हे निकष पूर्ण करणाऱ्या भागांना नवीन पंचायतीचा दर्जा दिला जाणार आहे. निकषांमध्ये त्या भागातील लोकसंख्या, घरांची संख्या आणि पंचायत मुख्यालयापासूनचे अंतर यावर आधारित असतील असे कंवर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button