breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाची शहर कार्यकारणी जाहीर

पिंपरी / महाईन्यूज

भाजपाची अनुसूचित जाती मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

यावेळी माजी खासदार आमर साबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व प्रदेश सचिव अमित गोरखे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, महीला शहर अध्यक्ष उज्वला गावडे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेविक राजू दुर्गे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर सरचिटणीस सुभाष सरोदे आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती मोर्चा शहर संघटन सरचिटणीस पदी बाबासाहेब त्रिभुवन, यांची निवड करण्यात आली. शहर सरचिटणीस पदी महेश भिसे व यशवंत दणाने यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय वाघमारे, विठ्ठल शिंदे, सुधाकर सुतके, संतोष रणसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच  सचिव, चिटणीस व सदस्यपदी अनेक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. तर, प्रसार माध्यम प्रमुखपदी प्रकाश इगवे यांची निवड करण्यात आली.

या वेळी आमदार महेश लांडगे व इतर मान्यवरांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बाबासाहेब त्रिभुवन यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button