breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिजबुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा जवानांनी केला खात्मा

जम्मू-काश्मीरच्या अवंतिपोरामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉपचा कमांडर रियाज नायकूचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील अवंतिपोरमध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. हिजबुलचा हा टॉपचा दहशतवादी कमांडर जाळयात सापडला होता. सुरक्षा दलांनी चकमक स्थळाला सर्व बाजूंनी घेरले होते. बिगपोरा भागामध्ये दहशतवादी लपल्याच माहिती मिळाल्यानंतर काल रात्रीपासून सुरक्षा दलांनी या भागामध्ये शोधमोहिम सुरु केली होती. अवंतिपोराच्याच शारशाली भागात दुसऱ्या एका चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान असे एकूण पाच जण शहीद झाले. दुसऱ्याचदिवशी सोमवारी हंदवाडा येथे चेकपॉईंटवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. पुढच्या काही दिवसात दहशतवाद्यांविरोधात आणखी मोठया प्रमाणावर ऑपरेशन्स करण्याचे संकेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button