breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ९० हजार ७९५ वर

  • पुण्यात ४,९३५, मुंबईत २,३७१ नवे कोरोना रुग्ण

मुंबई – राज्यात गुरुवारी दिवसभरातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्याने उसळी घेतली. काल दिवसभरात राज्यात तब्बल २३ हजार ४४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४८ रुग्णांनी आपला जीव गमावला. तसेच १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहोचली आहे. यापैकी २ लाख ६१ हजार ४३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ७ लाख ७१५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून २८ हजार २८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी २ हजार ३७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ६३ हजार ११५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ८ हजार २० इतका झाला आहे. दिलासादायक म्हणजे मुंबईत काल दिवसभरात १ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यासह मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख २८ हजार ११२ इतकी झाली आहे, तर सध्या २६ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढ होणाऱ्या पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ९३५ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावणेपाच हजारांहून अधिक नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. यात पुणे शहरातील १ हजार ९१६ रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ९ हजार ४२५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात गुरुवारी ८७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून ३ हजार २०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ४ हजार ८८१ वर पोहोचला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ लाख ६६ हजार २७४ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button