breaking-newsराष्ट्रिय

हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड

नवी दिल्ली | महाईन्यूज

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेल्या शरजील इमामच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. या जेएनयू विद्यार्थ्याच्या रिमांडला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांच्या चौकशी दरम्यान तो सतत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरं देत आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे लोक शरजीलच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र हे लोक पीएफआयशी संबंधित आहेत त्याची त्याला माहिती नाही असा दावा शरजीलने केलेला आहे.

तीन दिवसांच्या रिमांड दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शरजीलच्या जवळील 10-12 लोकांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. या सर्वांची बुधवारी चौकशी केली जाऊ शकते. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या चौकशीत जमाव भडकवण्यासाठी आणि हिंसाचार पसरविण्यासाठी देशभरात उघडलेल्या पीएफआयच्या 73 बँक खात्यांमध्ये १२० कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. म्हणूनच सीएए आणि एनआरसीच्याविरोधात हिंसा पसरवण्यामागे पीएफआयची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button