breaking-newsपिंपरी / चिंचवड

हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी चिखलीत वाहनफेरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – म्हेत्रेवाडी येथे धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेली भव्य वाहनफेरी उत्साहात पार पडली. दुचाकींवर लावलेले भगवे ध्वज, पारंपरिक वेशात सहभागी हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वाचा अभिमान जागृत करणार्‍या घोषणा, मुख्य चौकांमध्ये होणारी पुष्पवृष्टी आणि स्वागत यांमुळे संपूर्ण वातावरण हिंदुत्वमय झाल्याचे पहायला मिळाले.

3 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता म्हेत्रेवाडी येथील गजानन म्हेत्रे उद्यानाच्या मैदानात धर्मजागृती सभा होणार आहे. हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर संबोधित करणार आहेत.

शंखनाद आणि धर्मध्वजाचे पूजन करून वाहनफेरीला प्रारंभ करण्यात आला. म्हेत्रेवाडी येथील मरीआई मंदिर पासून- साने चौक- कोयनानगर- महात्मा फुले नगर- कृष्णानगर- म्हेत्रेवाडी चौक येथे फेरीचा समारोप झाला. समारोपप्रसंगी फेरीचे सभेत रूपांतर झाले. वाहन फेरीमध्ये 150 हून अधिक धर्मप्रेमी दुचाकी वरून सहभागी झाले होते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणत होती. दुपारी साडेचार वाजता सुरूवात झालेल्या सभेची सांगता सहा वाजता म्हेत्रे उद्यान येथे झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button