breaking-newsराष्ट्रिय

सत्तेसाठी आतापासूनच फिल्डींग, चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला

शेवटच्या टप्प्याच्या मतदानाच्या एक दिवस आधीच विरोधी पक्षांनी सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी दिल्लीमध्ये काँग्रेस, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षीय नेत्यांची भेट घेतली. नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबरोबर सरकार स्थापनेच्या दृष्टीने विरोधी पक्षांच्या एकजुटीबद्दल चर्चा केली.

त्यांनी शनिवारी सकाळी ब्रेकफास्टला सीपीआयचे नेते जी. सुधाकर रेड्डी आणि डी. राजा यांची भेट घेतली. नायडू यांनी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि एलजेडीचे नेते शरद यादव यांची सुद्धा भेट घेतली. नायडू यांनी यापूर्वी तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, आपचे अरविंद केजरीवाल आणि सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या बरोबर सुद्धा चर्चा केली आहे.

ANI

@ANI

Andhra Pradesh CM and Telugu Desam Party (TDP) Chief N. Chandrababu Naidu met Nationalist Congress Party (NCP) President Sharad Pawar in Delhi, earlier today.

149 people are talking about this

पंतप्रधान मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी महाआघाडी भक्कम करण्याचा त्यांचा इरादा आहे. लवकच ते बसप प्रमुख मायावती आणि सपाच्या अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाप्रणीत एनडीएला बहुमत मिळाले नाही तरीही ते सरकार स्थापनेचा दावा करत असतील तर अशा परिस्थितीत रणनिती तयार असली पाहिजे असे नायडूंनी राहुल गांधींना सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button