breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रहार अपंग संघटनेचे अनोखे आंदोलन; सहाय्यक आयुक्ते स्मिता झगडेंच्या खुर्चीला घातला हार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – अपंग आयुक्तालयासह अन्य विविध अपंगाच्या मागण्यांचे बैठकीचे सभा वृत्तांत देण्यास ताटकळत ठेवलेल्या प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिका-यांनी आज ( बुधवारी) नागरवस्तीच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. 

प्रहार अपंग क्रांती आंदोलन व महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाची एकत्रित बैठक घेतली होती. या बैठकीचा सभा वृत्तांत घेण्यासाठी पदाधिकारी आज (बुधवारी) या विभागात आले. यावेळी सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांच्याकडून ही माहिती मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नागरवस्ती विभागात हे सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी सकाळी आले होते. मात्र, या विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने दिव्यांग नागरिकांनी दोन तास वाट पाहिली.

एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहिला नाही. त्यामुळे दिव्यांग पदाधिका-यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या पदाधिका-यांनी बाहेरून एक हार मागवून सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला घालून, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. दिव्यांग नागरिकांना ताटकळत ठेवल्याने संताप व्यक्त केला जात असून झगडे यांच्या कार्यपद्धतीवर दिव्यांग नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

तसेच सतत पाठपुरावा करुनही अपंग विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमणे व शहरात होत असलेल्या अपंग भवनाबाबत संघटने बरोबर बैठक घेण्याबाबत निर्णय होत नाही. झालेल्या सभेचा वृत्तांत मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button