breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तेव्हा वेळ कमी मिळाला म्हणून पराभव झाला ; आता शिरुर लोकसभा परिवर्तनाची नांदी ठरेल

शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार तथा माजी आमदार विलास लांडेचा विश्वास 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मला कमी वेळ मिळाला, त्यामुळे सर्वत्र पोहोचता आले नाही, म्हणून पराभवाला सामोरे जावे लागले, आता शिरुर लोकसभा मतदार संघातील खेड, जुन्नर, आंबेगाव, चाकण, शिरुर, हाडपसर आणि भोसरीत कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या अनेक प्रश्न जटील झाले आहेत. गेल्या दहा वर्षात बैलगाडा शर्यत, रेडझोन, बफरझोन यासह अनेक प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. तर खेडचे विमानतळ अन्यत्र हलविले. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात नागरिकांचा रोष प्रचंड वाढला आहे. त्यामुळे या मतदार संघात परिवर्तन नांदी ठरेल, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी महाईन्यूजशी बोलताना व्यक्त केला. 

देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधा-यासह विरोधी राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणून विलास लांडे यांचे नाव निश्चित केल्याचे चर्चा आहे. त्यानुसार लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदार पिंजुन काढण्यास सुरुवात केली आहे. त्यावर लांडे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

लांडे म्हणाले की,  भाजप सरकारचा कारभार पाहता देशात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन अटळ आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे निश्चित करणार असून ते जे उमेदवार देतील त्यांचे काम आम्ही करणार आहे. त्यामुळे पक्षासाठी कामाला लागलो आहे. असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button