breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

हिंदुस्थान अॅंन्टीबायोटिक्स शाळेजवळ अज्ञाताकडून महिलेवर गोळीबार

पिंपरी – खराळवाडीतील हिंदुस्थान अॅंन्टीबायोटिक्स शाळेजवळील उपहारगृहात पेढे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी एकच्या सुमारास एच ए काॅलनीतील शाळेजवळ घडली. दरम्यान, सुदैवाने ती महिला त्या गोळीबारातून वाचली आहे. 

शितल सिकंदर (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शितल सिकंदर या दुपारी पावणे एकच्या सुमारास एच ए कॉलनीतील शाळेसमोरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button