breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे

– पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचे प्रतिपादन

पिंपरी | प्रतिनिधी

आपल्या देशात क्रिकेट खेळाला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. मात्र, जगात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल खेळाला त्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे क्रिकेट बरोबरच इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त शिवसेना यमुनानगर, युवासेना, सुलभा उबाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने यमुनानगर येथे आयोजित राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृष्ण प्रकाश यांनी अभिवादन केले. या वेळी ते बोलत होते.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश म्हणाले, कबड्डीला प्रेक्षक लाभल्यानंतर प्रायोजक मिळायला सुरूवात झाली. खेळ हा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या निरामय आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे, याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष वेधले. आपल्या जीवनात कधी-कधी नकारात्मकता येते. मात्र, अशावेळी खचून जाऊ नका, वाममार्गाला लागू नका. आपले कार्य आणि कर्तव्याशी बांधील राहून टीकाकारांना तुमचे कौतुक करायला भाग पाडा, असा सल्लाही कृष्ण प्रकाश यांनी दिला.

युवासेनेचे अजिंक्य उबाळे, आकाश सेंगर यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी प्रास्ताविक केले. शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका शुभांगी बोर्हाडे, रामभाऊ उबाळे, सचिन सानप, आबा भोसले, अनिल सोमवंशी, निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, अंकुश जगदाळे, जानी भाई, गणेश इंगवले, प्रतीक्षा घुले, निलेश हाके, संजय बोर्हाडे, शिवाजीराव मोहिते, महेश डोके, शशिकला उभे, भारती चकवे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button