breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे यांचे वादग्रस्त विधान, मुस्लिमांना दिली राक्षसाची उपमा

नांदेड: वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक नवे विधान करत आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकातून शिकवला जाणार नाही. याचे कारण म्हणजे शिवाजी महाराज शिकवायचे म्हणजे एका धर्माच्या लोकांना दुखावल्या सारखे होते. शिवाजी महाराजांची लढाई ही सतत त्यांच्या बरोबरच आहे. त्याच्या लढाया आणि त्यांचा इतिहास शिकवायचा म्हणजे ते दुखावले जाणार. मग ते दुखावलेले आम्हाला चालत नाहीत. राक्षसाला राक्षस म्हणायचे नाही. कारण राक्षस दुखावला जातो. राक्षसांची मतपेटी आहे. राक्षस दुखावले तर ती पाच लाख मते कशी मिळणार? म्हणून नकोच, असे विधान अभिनेते पोंक्षे यांनी केले आहे. (actor sharad ponkshe made a controversial statement about muslim community in nanded)

नांदेडमध्ये ब्राम्हण महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यकासाठी पोंक्षे नांदेडला आले होते. शहरातील मोर चौक येथे परशुराम जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

आपल्या आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजाचे चरित्र आणून ते मुलांना वाचायला दिले गेलेच पाहिजे. एकवेळ रामायण-महाभारत नाही वाचले तरी चालेल, स्तोत्र नाही म्हटली तरी चालतील पण छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामाची गोष्ट ही सांगितली गेलीच पाहिजे, असेही अभिनेते पोक्षे यांनी सांगितले.

‘… तर राहुल गांधींचेही कौतुक करेन’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगले वागले तर त्यांचेही मी कौतुक करणार . त्यांना जर उपरती झाली आणि ते म्हणाले मी सावरकरांना माफीवीर म्हणालो ती माझी चूक झाली, तर मी राहुल गांधी यांचे स्वागत करेन, असं वक्तव्य अभिनेते पोंक्षे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button