breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हाथरस घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत – प्रवीण दरेकर

पुणे – शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? हाथरस रोज मुंबईसह महाराष्ट्रात घडतेय होतेय. परंतु हाथरसचे राजकारण करण्यात आल्याचे सांगत दरेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हाथरस प्रकरणी टीकेचे रान उठवण्याऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या नातेवाईकांची भेट घेत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसात अशा घटना अनेक घडल्या आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. एखादा डोळा तरी पूर्ववत करावा, त्यासाठी मी स्वतः यंत्रणेशी संपर्कात राहणार आहे. एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा. तसेच काबाडकष्ट करूनपोट भरणारा परिवार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. पुण्यासाठी ही अशोभनीय घटना आहे. आमची मान शरमेने खाली जायला लावणारी ही घटना आहे असेही दरेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button