breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

‘… तर आमच्या वकिलांचीसुद्धा फौज तयार आहे’, जो बायडन यांचे ट्रम्पना प्रत्युत्तर

वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप केला असून त्याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दादही मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडनही यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जो बायडन कॅम्पेन टीमने म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली, मतमोजणी रोखण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले तर आमची सुद्धा वकिलांची फौज तयार आहे’.

बायडेन यांचे प्रचार व्यवस्थापक जे ओ डिलॉन यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटले की, “राष्ट्राध्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया रोखण्यासाठी कोर्टात गेले, तर आमची सुद्धा कायदेशीर वकिलांची फौज त्यांचा विरोध करण्यासाठी तयार आहे.”

ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत” असे ट्रम्प व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“आपण दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्या हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही” असे ट्रम्प म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button