breaking-newsराष्ट्रिय

बुरहान वानीच्या गावाचा मतदानावर बहिष्कार; शून्य मतदानाची नोंद

काश्मीर खोऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि.६) पार पडले. खोऱ्यात खूपच कमी प्रमाणात मतदान झाले. अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यात केवळ २.८१ टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात ही सर्वात निच्चांकी मतदानाची आकडेवारी ठरली आहे. तर तीन वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वानी याच्या गावातील लोकांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला. त्यामुळे या गावात एकाही मतदानाची नोंद झाली नाही. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आत्मघाती आदिल अहमद दार याच्या गावात केवळ १५ लोकांनीच मतदान केले. दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या म्होरक्यांच्या गावांतही कोणीही मतदान केले नाही.

प्राथमिक आकडेवारीनुसार, लडाखमध्ये ६३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काश्मीरमधील मतदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला होता. मात्र, त्यानंतर मतदानाच्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली. पहिल्या टप्प्यात दक्षिण काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात ३५ टक्के आणि मध्य काश्मीरच्या श्रीनगरमध्ये १४ टक्के मतदान झाले होते. अनंतनागमध्ये पहिल्यांदा १३.६३ टक्के आणि त्यानंतर कुलगाम जिल्ह्यात १०.३ टक्के मतदान झाले.

दहशतवाद्यांचे केंद्र असलेल्या शोपियाँ आणि पुलवामात मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. नुकतेच शोपियाँत एका चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर काही तरुणांना बेकायदा कारवायांबाबत ताब्यात घेण्यात आले होते. यामुळेच इथे मतदान कमी झाले असावे असे सांगण्यात येत आहे. या भागात काही मतदान केंद्रांवर गोंधळाच्या घटनाही समोर आल्या होत्या. तीन केंद्रांवर ग्रेनेड फेकण्यात आले होते. मात्र, तरीही शोपियाँतील काही भागात उंचावर असणाऱ्या पहाडी भागात चांगले मतदान पहायला मिळाले.

दरम्यान, शोपियाँतील मनलू गावातील तरुण अब्दुल हमीदने सांगितले की, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा कायम राखण्यासाठी मी मतदान करणार आहे. आम्हाला आमचा असा प्रतिनिधी हवा आहे जो आमच्या चांगल्या भविष्यासह आमचा इतिहासही शाबूत ठेवेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button