breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

स्वत:वरचा ताबा सुटलाय का?; मंत्री जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ट्विटरवर शाब्दिक ‘वॉर’

मुंबई | महाईन्यूज

दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत असताना मुंबईतही या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेट ऑफ इंडिया येथे आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. यावेळी एका महिला आंदोलकाच्या हातात ‘फ्रि काश्मीर’ आशयाच्या बोर्डाने नवा वादाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला मंत्री जयंत पाटील यांनीही टोला लगावलेला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारलेला होता. आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का, असा सवाल फडणवीस यांनी केलेला होता.

यावर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना उत्तर देत काश्मीर मुक्त करा याचा अर्थ भेदभावापासून, नेटवर्कवरील आणि केंद्र सरकारच्या जाचातून मुक्त करा असा होतो असे बोलले आहे. तुमच्यासारखे नेते शब्दांचे अनर्थ काढून तिरस्काराची भावना निर्माण करतात. तुमच्यासारखा जबाबदार नेते अशाप्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो यावर विश्वास बसत नाही असा चिमटा काढलेला आहे. 

त्याचसोबत कदाचित सत्ता गमावल्यानंतर असं होऊ शकतं नाहीतर तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? असा प्रश्न जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button