breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुंबईसह देशभरात 8 जानेवारीला भारत बंदची हाक…25 कोटी लोकं सहभागी होण्याची शक्यता…

मुंबई | महाईन्यूज |

मुंबईसह देशभरात 8 जानेवारी दिवशी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात ही बंदची आणि आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान त्याचा परिणाम समान्यांच्या जनजीवनावर होण्याची शक्यता आहे. मुंबईसह देशातील वाहतूक व्यवस्था देखील या काळात बाधित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याच्या देशव्यापी बंदामध्ये 10 ट्रेड युनियन्स सहभाग घेणार आहेत. याच ट्रेड युनियन्सने केलेल्या दाव्यानुसार, उद्याच्या भारत बंद मध्ये 25 कोटी लोकं सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे. याचा परिणाम मुंबईसह देशातील ट्रेन, बस, ऑटो रिक्षा यांच्यावर होणार आहे. प्रामुख्याने मेट्रो शहरामध्ये भारत बंदाचा परिणाम जाणवणार आहे..

सरकारच्या “anti-people” धोरणांविरूद्ध हा बंद पुकारला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  सरकारने घेतलेल्या कामगारविरोधी, जनमताविरोधी आणि देश विरोधी निर्णयांचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात येत आहे,” असं समितीने म्हटलं आहे. दहा कामगार संघटनांनी एकत्रितरित्या जारी केलेल्या पत्रकामध्ये, “२ जानेवारी २०२० रोजी कामगार मंत्रालयाने बोलावलेल्या बैठकीमध्ये कामगारांना आश्वासन देण्यात आलेली एकही मागणी मान्य झाली नाही. आम्ही सरकारच्या धोरणांना आणि कृतीला विरोध केल्याने सरकारने कामगारांचा तिरस्कार करण्याचे धोरण स्वीकारले आहे,” अशी खंत या संघटनांनी पत्रकामधून व्यक्त केली आहे. देशभरातील वेगवगेळ्या विद्यापिठांमध्ये होत असलेल्या हिंसेचा कामगार संघटनांनी निषेध केला आहे.

एवढच नाही तर, जुलै २०१५ पासून एकदाही ‘भारतीय कामगार परिषदेचे’ आयोजन करण्यात न आल्याबद्दलही या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक सार्वजनिक श्रेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येत असल्याबद्दलही संघटनांनी आक्षेप व्यक्त केला आहे. “देशातील १२ विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले आहे. एअर इंडियासारखी सरकारी कंपनीही विकण्याची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर पीपीसीएल विकण्याच्या तयारीत सरकार आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलचे विलिनीकरण करण्याची घोषणा करत या कंपन्यांमधील ९३ हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडत बेरोजगार केले आहे,” असं या संघटनांनी पत्रकामध्ये म्हटलं आहे. रेल्वे तसेच युद्ध सामृग्री बनवणाऱ्या कंपन्यांबरोबरच अनेक बँकाच्या विलिनीकरणालाही या संघटनांचा विरोध आहे

या मोहीमेला विद्यार्थी आणि शेतक-यांनी पाठींबा दर्शवला आहे.देशभरातील ६० वेगवेगळ्या विद्यार्थ्यी संघटनांनीही या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशामध्ये शिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याने विद्यार्थीही या संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या बंदला देशभरातील १७५ शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या बंदला 10 केंद्रीय व्यापारी संघटना, डावे पक्ष आणि अनेक बँकाचे कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा आहे

या बंदचा परिणाम त्यामुळे टॅक्सी, रिक्षा यांच्या सेवेवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात ओला, उबर नियमित सुरू राहणार आहे. तर या काळात विमानसेवा देखील सुरळीत राहणार आहेत. आपत्कालीन सेवा या भारत बंदच्या काळात सुरू राहणार आहेत.

मुंबईमध्ये 25 लाख प्रवासी सुमारे 3000 बेस्टच्या माध्यमातून प्रवास करतात. तसेच मुंबई लोकलमधूनदेखील लाखो प्रवासी नियमित प्रवास करतात. जर उद्या या सार्‍या सेवांना फटका बसला तर, अनेक मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दर ओला, उबरचे भाव देखील या काळ वधारू शकतात. भारत बंदचा परिणाम बँकींग व्यवहारावरही होण्याची शक्यता आहे. काही बँका बुधवारी बंद राहू शक्यताही वर्तवण्यात आली आहे..

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, सारख्या ट्रेड युनियन या काळात बंदामध्ये सहभागी राहणार आहेत. या आंदोलनामध्ये लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत. सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच शिक्षक आणि इतर क्षेत्रातलेही सहभागी होणार आहेत…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button