breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आता मास्कलाच कोरोनाची लस समजा : केंद्रीय आरोग्यमंत्री
दिल्ली – दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी दिल्लीत दिवसभरातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर लस येण्यास अजून काही काळ जाणार असल्याने सध्या तोंडाला मास्क लावणे हीच लस माना, असा सल्ला दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिला आहे.