breaking-newsमहाराष्ट्र

स्मार्ट हेल्मेटने एका मिनिटात 200 जणांचे थर्मल स्क्रिंनिंग

कोरोनाला रोखण्यासाठी तपासणी, चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी पालिका आता स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग करीत आहे. दहिसरमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात 6 हजार 500 जणांची तपासणी करण्यात आली.

स्क्रिनिंगची संख्या वाढवण्यासाठी आता थर्मल स्क्रिनिंगसाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे. यामध्ये एका वेळी दोन रांगांमध्ये दोनशे लोक उभे केले तरी स्मार्ट हेल्मेट घातलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या माध्यमातून एका मिनिटात 200 जणांचे टेंपरेचर चेक करता येते. हेल्मेटला उजव्या आणि डाव्या बाजूला थर्मल स्क्रिनिंग मशीन असते. त्यामुळे ताप असलेली व्यक्ती समजल्यामुळे तातडीने बाजूला काढता येते, अशी माहिती झोन – 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. यावेळी विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, ‘आर उत्तर’च्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यादेखील उपस्थित होत्या. भारतीय जैन संघटनेकडून उपलब्ध करून दिलेल्या या हेल्मेटच्या माध्यमातून पालिका ही तपासणी करीत आहे. सध्या या स्मार्ट हॅल्मेटच्या माध्यमातून घरोघरी जाऊन, फळविव्रेâते, दुकानदार आदींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे.

सुरक्षित पद्धत, वेगाने तपासणी

स्मार्ट हेल्मेट स्क्रिनिंगमुळे तपासणी करणारा आरोग्य कर्मचारी आणि तपासणी करण्यात येणारी व्यक्ती यांच्यात सुमारे चार ते पाच पुâटांचे अंतर असते. यामुळे या तपासणीत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. त्यामुळे स्क्रिनिंगसाठी ही सुरक्षित पद्धत असून वेगाने तपासण्या होत असल्याचे विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी सांगितले. झोपडपट्ट्यांबरोबरच सध्या कोरोना जास्त प्रमाणात सोसायट्यांमध्येही ही पद्धत वापरायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button