breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

12 वीच्या निकालानंतर महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रीया देखील सुरु झाली आहे. कोविड-19 च्या संकटामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातही उशिरा होत आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीला 18 जुलै पासून सुरुवात झाली आहे. या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना 4 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. शहरी भागांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रकिया सुरु होईल. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या भागांत ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रकिया पार पडेल.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रकीयेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 18 जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीमध्ये आतापर्यंत तब्बल 67 हजार 514 विद्यार्थांनी रजिस्ट्रेशन केले आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी 56 हजार 129 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट देवून यातील Mumbai University Pre Admission online Registration 2020-21 या लिंकवर क्लिक करा. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी 022-66834821 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button