breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी,(महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात चिखलीतील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. याठिकाणी 6080.63 चौरस फुटाची नऊ अनधिकृत बंधकामे जमिनदोस्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका लावला आहे. क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील अधिकृत बांधकामे पाडण्यात येत आहेत. मंगळवारी (दि. 18) चिखली येथे जोरदार करावाई करण्यात आली. यामध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नऊ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ही बांधकामे 6080.63 चौरस फुटाची होती.

ही कारवाई कार्यकारी अभियंता सतिश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपभियंता नितीन निंबाळकर यांच्या पथकाने केली. त्यासाठी दहा जेसीबी, एक ट्रक, चार मजूर यांचे सहकार्य घेण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button