breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संचलनतूट आणि पास सवलतपोटी ‘पीएमपीएमएल’ला मिळणार 22 कोटी

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा निर्णय
  • प्रतिमहा 7 कोटी 50 लाख याप्रमाणे तीन महिने अदा करणार

पिंपरी, (महाईन्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाकडून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी देय असलेल्या संचलनतूट आणि सवलतीच्या प्रवासी पासेसपोटी 2018-19 या चालू वर्षासाठी 7 कोटी 50 लाख रुपये पीएमपीएमएलला अदा करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांसाठी 22 कोटी 50 लाख रुपये एवढी रक्कम देण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आज मंजुरी दिली आहे.

स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली पाठीमागील तहकूब सभा आज शुक्रवारी घेण्यात आल्या. 2 मे 2019 रोजीच्या सभेतील पीएमपीएमएल व्यवस्थापनाच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात पीएमपीएमएलसाठी 190 कोटी 82 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये संचलनतूट 97 कोटी 82 लाख, विविध प्रकारचे पासेस सुविधेसाठी 18 कोटी आणि बसेस खरेदीसाठी 75 कोटी एवढा खर्च अपेक्षीत आहे.

संचलनतूटीपोटी चालू वर्षात प्रतिमहा 6 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सवलतीचे पासेस दिल्यापोटी 1 कोटी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. अशी प्रतिमहा 7 कोटी 50 लाख एवढी रक्कम तीन महिन्यांसाठी महापालिका अदा करणार आहे. म्हणजे तीन महिन्यांची एकूण 22 कोटी 50 लाख एवढी रक्कम पीएमपीएमएलला द्यावी लागणार आहे. ही रक्कम तूट कायम होईपर्यंत एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 अखेर 11 महिने अदा केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आजच्या स्थायीच्या सभेत घेण्यात आला. त्याला अध्यक्ष मडिगेरी यांनी मंजुरी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button