स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
- दहावी – बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवार (दि.५ ) इंद्रायणीनगरमध्ये आयोजित केला आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. याप्रसंगी खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी साडेदहा वाजता प्रभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण, दुपारी १२ ते १ या वेळेत भोसरी पांजरपोळ येथील अंध शाळेत अन्नदान व आर्थिक मदत,महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, बिस्कीट वाटप, भोसरी येथील आश्रम शाळेत ३५० मुलं राहतात, त्या मुलांना आर्थिक मदत व अन्नदान, चिंचवड येथील गुरुकुलाम संस्थेस आर्थिक मदत व अन्नदान करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे.