breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे ऋण फेडण्याचे काम करा – आमदार महेश लांडगे

  • पाच हेक्टरमध्ये एक हजार झाडांची लागवड

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  वनविभागाच्या वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते डुडूळगाव येथील फॉरिस्ट वन गट 90 मधील पाच हेक्टरमध्ये एक हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये पिंपळ, वड, चिंच, करंद, आवळा या झाडांचा समावेश आहे. दरम्यान, वृक्षलागवडीतून पर्यावरण पूरक काम करून वसुंधरेचे ऋण फेडण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”राज्य सरकारचा यंदा 33 कोटी नवीन वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प आहे. तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन, शुद्ध हवा देतात. पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आता नागरिकांना पटू लागले आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे प्रत्येकाने झाड लावले पाहिजे”.

”अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होतात. त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नाही. त्यामुळे लावलेले झाड जगविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे संगोपण केले पाहिजे. एक झाड कमी लावले. तरी, चालेल पण लावलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button